I hope तुला माहित्ये
की मी अजून जिवंत आहे...
नुसताच ‘जिवंत’ आहे की खरंच ‘जगतोय’
हा प्रश्न मात्र ज्वलंत आहे
I hope तुला माहित्ये
की मी अजून जिवंत आहे...
प्रेमाचा ओलावा होता जिथे
तिथे आता टिपूसही दिसत नाही
खरंतर प्रेम म्हणावं की नुसतीच ओढ
तेच आता कळत नाही
पण कोरडेपण दिसलं जरी
रखरखाट असला जरी वरवर
तरी आत खोल कुठेतरी
कधीतरी फुललेला वसंत आहे
I hope तुला माहित्ये
की मी अजून जिवंत आहे...
आठवणींचा अल्बम चाळला जातोच
सोबतीत सरलेला प्रत्येक क्षण दिसत जातो लख्ख
आनंदही तितकाच होतो
नि तितकंच होतं दु:ख
त्या दु:खापेक्षा, अर्थातच मला
आनंद जास्त पसंत आहे
I hope तुला माहित्ये
की मी अजून जिवंत आहे...
तिकडे तू आणि इकडे मी
दोन ध्रुवांवर असल्याची होते जाणीव
म्हटलं तर दोघे परिपूर्ण
तरीही कसलीशी जाणवते उणीव
पण हल्ली मीही असतो बिझी
आणि तुला तरी कुठे उसंत आहे...
But I hope तुला माहित्ये
की मी अजून तरी जिवंत आहे...
नुसताच ‘जिवंत’ आहे की खरंच ‘जगतोय’
हा प्रश्न मात्र ज्वलंत आहे...
I hope तुला माहित्ये
की मी अजून जिवंत आहे
- अभिजित भागवत
Sunder kavita abhi khup chan vyakta hotoyas keep it up
ReplyDeleteThank you 😊
Deleteबिनतोड आहे रे भावा... hopefuly ही कविता तिलाही पसंत आहे...
ReplyDeleteमी अख्खी कविता माझ्या मित्रांना वाचून दाखवली... त्यांनाही खूप आवडली...
लवकरच ह्याचा ऑडिओ पाठवतो तुला...
Thank you very much!
DeleteI think this is the first time someone has read out / recorded something written by me 😀😀
अभिजीत फार छान कस सूचत याच माला कोड आहे
ReplyDeleteधन्यवाद काका 😀
DeleteSuperb!
ReplyDeleteThank you 😀
Deleteफारच छान
ReplyDeleteधन्यवाद 😊
DeleteKhupach sunder
ReplyDeleteThanks
Deleteतुझ्यातील कलाकार सुद्धा अजून जिवंत आहे!👍
ReplyDelete😃😃
Delete"अजुन मी जिवंत आहे" धन्यवाद अभिजित
ReplyDeleteपण गहन प्रश्न हा मी कोण आहे?
🙏🏼
DeleteKhup chaan
ReplyDeleteThank you 😀
DeleteZakas aahe :)
Delete