Friday, 30 November 2018

खरी सकाळ

फार काही विचित्र नाही,
पण परवा एक प्रकार घडला
भल्या सकाळी एक कुत्रा
वासुदेवावर भुंकताना पाहिला

मी थोडा बिचकलो,
आश्चर्यानं पहात राहिलो
रोजचंच आहेअसं म्हणून
वासुदेव शांत हसला

पुढे होऊन मी थोडंसं चुचकारलं,
तेवढ्यापुरतं थोपटलं
आजचा मॉडर्न कुत्रा तो,
थोड्या आमिषानं शांत बसला

वासुदेवाचा वेष पारंपारिक,
कुत्र्याला स्वेटर घातलेला
पेहरावातल्या फरकालाच विषमता समजून
बहुधा तो भुंकू लागलेला

आल्यासारखा वासुदेव
त्याच्या वाटे निघून गेला
मी कुत्र्याकडे
नि कुत्रा त्याच्याकडे बघत राहिला

उगवतीचा मंत्र गात जाणारा
पाठमोरा वासुदेव
मित्रांनो, ‘खरी’ सकाळ ही अशी असते
एवढं मात्र सांगत राहिला

फार काही विचित्र नाही,
पण अगदी परवाच हा प्रकार घडला...


-अभिजित

Friday, 9 November 2018

मी अजून जिवंत आहे...

I hope तुला माहित्ये
की मी अजून जिवंत आहे...
नुसताचजिवंतआहे की खरंचजगतोय
हा प्रश्न मात्र ज्वलंत आहे

I hope तुला माहित्ये
की मी अजून जिवंत आहे...

प्रेमाचा ओलावा होता जिथे
तिथे आता टिपूसही दिसत नाही
खरंतर प्रेम म्हणावं की नुसतीच ओढ
तेच आता कळत नाही
पण कोरडेपण दिसलं जरी
रखरखाट असला जरी वरवर
तरी आत खोल कुठेतरी
कधीतरी फुललेला वसंत आहे

I hope तुला माहित्ये
की मी अजून जिवंत आहे...

आठवणींचा अल्बम चाळला जातोच
सोबतीत सरलेला प्रत्येक क्षण दिसत जातो लख्ख
आनंदही तितकाच होतो
नि तितकंच होतं दु:
त्या दु:खापेक्षा, अर्थातच मला
आनंद जास्त पसंत आहे

I hope तुला माहित्ये
की मी अजून जिवंत आहे...

तिकडे तू आणि इकडे मी
दोन ध्रुवांवर असल्याची होते जाणीव
म्हटलं तर दोघे परिपूर्ण
तरीही कसलीशी जाणवते उणीव
पण हल्ली मीही असतो बिझी
आणि तुला तरी कुठे उसंत आहे...
But I hope तुला माहित्ये
की मी अजून तरी जिवंत आहे...
नुसताचजिवंतआहे की खरंचजगतोय
हा प्रश्न मात्र ज्वलंत आहे...

I hope तुला माहित्ये
की मी अजून जिवंत आहे


अभिजित भागवत

Thursday, 18 October 2018

देव और दानव

कोई एक, राम बनकर
रावण पर तीर ताने खडा हुआ...
निश्चित हुई जीत की भावना से
मन ही मन गर्व से चढा हुआ

रावण हँसा मन में, बोला,
गर पता होता की तुम
देव के भेस में छुपे दानव होगे,
वापस ले जाकर सीता को
फिर से वनवास भेज दोगे...
सीता को हरने का
विचार ही मन से निकाल देता
और मुझपर तीर चलाने का
हक़ भी मैं तुमसे छीन लेता...

इतने में चला तीर और
लिपट गया रावण ज्वालाओं से
राम को सबने उठा लिया
और गढ़ दिया फूलों की मालाओं से

जलता हुआ रावण सोच में डूबा
कौन झूठा है और कौन सच्चा है
ऐसे रामराज्य में रहने से तो
जल जाना अच्छा है...

ऐसे रामराज्य में रहने से तो
जल जाना अच्छा है |


अभिजित भागवत

Sunday, 2 September 2018

पुरस्कार

ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांना एका सोहळ्यात मिळालेला जीवनगौरव पुरस्कार आणि त्यानंतर लगेच काही दिवसांनी त्यांचं झालेलं निधन यावरुन सुचलेलं.....

----------------------------

नाही-नाही म्हणता म्हणता तोंडाला रंग लागलाच
नाटकाचा हा वळवळता किडा एके दिवशी चावलाच!

भान हरपून भूमिकेत शिरावं अन् ती भूमिकाच आयुष्य बनावं
आत्मा हे मूळ नि शरीर झाड बनावं, याला जादू नव्हे तर आणखी काय म्हणावं?

तिसरी घंटा कानी येता, पडदा सरसर उघडत जाता
एवढासा पोकळ रंगमंच, अवकाश बनतसे बघता बघता

परकायाप्रवेशाची झिंग अशी न्यारी
डोळ्यांदेखत बदलते दुनिया सारी
शब्दांना ती येता धार, नजरही जाता क्षितिजापार
प्रेक्षकातुनी येता दाद, समाधान ते मिळे अपार

प्रयोगापरि प्रयोग घडले, कधी ढोल, कधी ताशे झडले
प्रयोग ते... काही चालले, काही पडले

वर्षांमागून वर्ष गेली, काळ्याचे पांढरे झाले
एके दिवशी अचानकच एका सोहळ्याचे आमंत्रण आले

सोहळा तसा फार नवीन नव्हता, पण पुरस्कार हा प्रकार कधी पाहिला नव्हता
आज ती बाहुली हातात आली तेव्हा, अवघा रसिकगण उठून उभा होता

स्टँडींग ओव्हेशनची काही पहिलीच वेळ नव्हती
पण ही मात्र आजवर केलेल्या कामाची पावती होती

अजूनही पुन्हा करु शकतो प्रत्येक भूमिका केलेली
अजूनही मनात उभारी होती, पण गात्रं गलित झालेली

जेमतेम चार शब्द बोललो उभा राहून, नि कसाबसा बसलो खाली
कुठेतरी जाणवलंच, ‘एक्झिटची वेळ जवळ आली

प्राण जाईपर्यंत रंगसेवेची शपथ घेतली खरी
पण डोळ्यांसमोर दिसलीच, पुरवून खात आलेलो ती दोन चतकोर भाकरी

पुन्हा एकदा टाळ्या वाजल्या, पुन्हा एकदा आली दाद
तालसुरांचा जणु लागला, परमोच्च त्या क्षणी तीव्र निषाद

तोंडून गेलेला संवाद जेव्हा कडाडून टाळ्या मिळवतो
पुरस्कार पुरस्कार म्हणतात, तो याहून वेगळा काय असतो...

पुरस्कार पुरस्कार म्हणतात,
तो याहून वेगळा काय असतो!


-अभिजित

Wednesday, 15 August 2018

तो

नुकतीच सत्तरी पार केलेला
एक पोरसवदा म्हातारा
आज पुन्हा एकदासमोरच दिसला

कवळी  लावलेलाकेस  पिकलेला
गरज की फॅशन कोण जाणेपण चष्मा लावलेला
तसा वरचेवर दिसतोच तो,
पण आज थोडा नटलेला वाटला

ओळखीचं स्माइल दिलं
तर तोही प्रसन्न हसला
आज त्याला वेळ असावा बहुधा,
येऊन शेजारीच बसला

आज वाढदिवस आहे माझा
अचानकच तो म्हणाला
मी अभिनंदन केलंतर म्हणे,
माझं कसलंखरंतर शुभेच्छा तुम्हाला!’

पाहिलं नाहीस का,
सेलिब्रेशनसाठी जमाव जमल्येत
लिहून आणलेली भाषणं
नि ठरलेल्या ठेक्यावर कवायतही झाली
मी थोडा गोंधळलो,
काय बोलावं पंचाईत झाली

तुमचं असं कोणी नाही का?’
थोडं वैयक्तिक असं मी विचारलं
थोडा आगाऊपणाच होतोयसं वाटलं
म्हणून पटकन स्वत:ला सावरलं

तसं नाही...’ म्हणाला,
मुलं आहेतनातवंडं आहेत,
कोणी इथेचकोणी परदेशात असतो
पण जवळ असं कोणीच नाही,
त्यामुळे हल्ली मी एकटाच रहातो

येऊन-जाऊन असतात
अधूनमधून आठवण काढतात
अहो प्रत्येकाला आपापला संसार आहे
त्यात आणखी मधे मी आलो की जबाबदाऱ्या वाढतात

कोणी प्रेमानं विचारपूसही करतो
कोणी आदरानं करतो सलाम
सख्खा काय नि सावत्र कायदोघे माझेच
पण कोणी कसाब झालाकोणी झाला कलाम

अगदीच वाळीत टाकलं नाहीये मला अजून तरी
हसून तो म्हणाला,
पण पापणी त्याची ओलावली
थोडी का होईनापण नाराजी
सुरात त्याच्या जाणवली

मी काही करु शकतो का?’
आतून आल्यासारखा माझा प्रश्न आला
गहिवरुन त्याने मिठी मारली
आणि फार काही  बोलता निघून गेला

वळून पाहिलं तर ताठ होता त्याचा कणा
टक्केटोणपे बरेच खाल्ले असतील त्याने
पण सोडला नव्हता बाणा

अप्रूप वाटलं त्याच्या विजिगिषु वृत्तीचं
अन् थोडी लाजही वाटली स्वत:ची
तो पुढे जातच रहाणार,
गरज आहे ती आपण त्याच्या वाटेवर
त्याला साथ देण्याची...

नुकतीच सत्तरी पार केलेला तो,
आज पुन्हा एकदा समोर दिसला...

-अभिजित

Thursday, 9 August 2018

आवाज

आवाज

हल्ली काय झालंय,
हल्ली आवाजालाही जात आल्ये...
कुणी म्हणतं आंदोलन,
कुणी म्हणे गवताला
तलवारीची पात आल्ये

पात झाली म्हणून का
गवतानं आपली रीत सोडावी?
पोटं भरण्याऐवजी
मुक्या जिवांचीही जीभ कापावी?

आवाजाचं म्हणाल ना,
तर तो सगळीकडेच आहे
पण हल्ली, तो विचाराच्याही
एक पाऊल पुढेच आहे

नुसती एक साद आली की त्याला
प्रतिसाद देणारा आपला समाज आहे
खरी गोची तिथे आहे
जिथे विचाराविना आवाज आहे

आताश्या नुसतं खुट्ट झालं
तरी भीती वाटते धमाका होण्याची
जीव गेला तर ठीक
खरी धास्ती आहे मनानं पांगळं होण्याची

आपला आवाज ऐकला जावा
म्हणून गोंगाट करणारेच फार झाल्येत
भावनांचे वाहक म्हणून जन्मलेले सूर
मूळ शब्दांनाच भार झाल्येत

सवयच जडल्ये आता आवाजाची अरेरावी
मुकेपणानं सहन करण्याची
सहजसोपे असलेले प्रश्न
मुद्दामच गहन करण्याची

वैश्विक वगैरे असलेले प्रश्न
मेंदूला सोडवत बसू दे
एकच प्रार्थना...
मनातल्या आवाजांचे संवाद होऊन
सारं जग हसू दे...
सारं जग हसू दे

- अभिजित

Thursday, 7 July 2016

wo din.....

अरसों बाद, कईं बरसों बाद
फिर एक मुलाक़ात
एक पहचानी सी मुस्कान
पहचानी सी हँसी
पर आज.... मेरी अलग, उनकी अलग

धुंधले हुए बादल, भीगे हुए पेड
उलझे हुए दिल, सुलझी हुई बातें
बातों में ठंडी होती गरम चाय की प्याली
पर आज.... मेरी अलग, उनकी अलग

धीमे से खुलती यादें
यादों को रोकती, टिकटिकाती घड़ी
अचानक बरसता पानी
हडबडी-गडबडी में खुलता हुआ छाता
पर आज.... मेरा अलग, उनका अलग

अगली मुलाक़ात का उड़ता हुआ वादा
अच्छेखासे थमें लम्हों को
आगे धकेलता रास्ता
पर आज.... मेरा अलग, उनका अलग

- ab

Monday, 16 November 2015

What am I doing....

What am I doing.... Where am I leading to....
It’s burning out there and I’ve nothing to do!

Everyone is selfish, everyone is unsafe
Everyone is blind, dumb and deaf

Dreams were supposed to be ‘the truth’
It’s the human who has become a brute

There was a vision when thoughts were gathered
Today, dreams seem shattered and no one is bothered

Storms were born to provide freedom and fame
Today, Cyclones are ‘designed’ to destroy the same

Named as ‘mob’ earlier, is transformed to ‘gang’
And smallest of the crackers is making a big bang

Everything today, seems false and fake
Even ‘The News’ today, has a commercial break

What am I doing.... Where am I leading to....
It’s burning out there & I’ve nothing to do!

Just one prayer - let there be joy, happiness and peace
Be it humans, amphibians, aquatics or geese

Amen!

- ab 

Tuesday, 18 August 2015

independence!

on a special day (that fell on saturday, august, 15th this year), for a change, i got up quite early (at around 4.45 am!)... got ready... caught a bus for thane... reached at 10am... got fresh... went to a friend's place... met schoolmates... been to old 'katta' to meet my theatre group... back home at 10pm... a drink & dinner... slept!
for me, as usual, the day was over! rather, the 'independence day' was over!
honestly i did not do anything that made myself feel like an independence day. i didn't do any flag hosting, neither did i participate in any rally, nor did i go for any 'abhiyaan', nor did i watch the parade & honourable prime minister's speech on tv!

all i did - in fact, all i do everyday is:
i follow traffic rules;
i don't support bribing;
i don't spread any rumours on social media;
i don't forward any message that insults any political leader (irrespective of any good or bad track record of that leader);
i never spit or throw any garbage at public places;
i try to save the water & electricity whenever & wherever possible;

isn't it a way to celebrate the independence?
not just on a specific day or date... but all 365 days of a year!
isn't it a true meaning of freedom?

it's not any philosophy to be taught to people through any reality show on some tv channel
it's not any extra-ordinary skill that needs any specific course or coaching or training
it's not any rocket science

it's just a belief that every person should have & should follow it whole-heartedly
it's just a way to contribute to the growth & well-being of country & humanity
it's just something i always wanted to share

jai hind!
-ab