नुकतीच सत्तरी पार केलेला
एक पोरसवदा म्हातारा
एक पोरसवदा म्हातारा
आज पुन्हा एकदा, समोरच दिसला
कवळी न लावलेला, केस न पिकलेला
गरज की फॅशन कोण जाणे, पण चष्मा लावलेला
तसा वरचेवर दिसतोच तो,
पण आज थोडा नटलेला वाटला
ओळखीचं स्माइल दिलं
तर तोही प्रसन्न हसला
आज त्याला वेळ असावा बहुधा,
येऊन शेजारीच बसला
‘आज वाढदिवस आहे माझा’
अचानकच तो म्हणाला
मी अभिनंदन केलं, तर म्हणे,
‘माझं कसलं, खरंतर शुभेच्छा तुम्हाला!’
‘पाहिलं नाहीस का,
सेलिब्रेशनसाठी जमाव जमल्येत
लिहून आणलेली भाषणं
नि ठरलेल्या ठेक्यावर कवायतही झाली’
मी थोडा गोंधळलो,
काय बोलावं पंचाईत झाली
‘तुमचं असं कोणी नाही का?’
थोडं वैयक्तिक असं मी विचारलं
थोडा आगाऊपणाच होतोयसं वाटलं
म्हणून पटकन स्वत:ला सावरलं
‘तसं नाही...’ म्हणाला,
‘मुलं आहेत, नातवंडं आहेत,
कोणी इथेच, कोणी परदेशात असतो
पण जवळ असं कोणीच नाही,
त्यामुळे हल्ली मी एकटाच रहातो’
‘येऊन-जाऊन असतात
अधूनमधून आठवण काढतात
अहो प्रत्येकाला आपापला संसार आहे
त्यात आणखी मधे मी आलो की जबाबदाऱ्या वाढतात’
‘कोणी प्रेमानं विचारपूसही करतो
कोणी आदरानं करतो सलाम
सख्खा काय नि सावत्र काय, दोघे माझेच
पण कोणी कसाब झाला, कोणी झाला कलाम’
‘अगदीच वाळीत टाकलं नाहीये मला अजून तरी’
हसून तो म्हणाला,
पण पापणी त्याची ओलावली
थोडी का होईना, पण नाराजी
सुरात त्याच्या जाणवली
‘मी काही करु शकतो का?’
आतून आल्यासारखा माझा प्रश्न आला
गहिवरुन त्याने मिठी मारली
आणि फार काही न बोलता निघून गेला
वळून पाहिलं तर ताठ होता त्याचा कणा
टक्केटोणपे बरेच खाल्ले असतील त्याने
पण सोडला नव्हता बाणा
अप्रूप वाटलं त्याच्या विजिगिषु वृत्तीचं
अन् थोडी लाजही वाटली स्वत:ची
तो पुढे जातच रहाणार,
गरज आहे ती आपण त्याच्या वाटेवर
त्याला साथ देण्याची...
नुकतीच सत्तरी पार केलेला तो,
आज पुन्हा एकदा समोर दिसला...
-अभिजित
Khupach Chan
ReplyDeleteKhupach Chan ani touching ahe. Vichar karayla lavnara vishay ahe
ReplyDeleteBharat desha kankhar desha
ReplyDeleteDhanyavad abhijit
Thanks n regards girish joshi
सुंदर!!
ReplyDeleteKhar sangu ka, mi hi tyachyavar kadhi kadhi ugach ch chidato, vadyach tel vangyavar kadhato, mag maz malach umagat nahi, to mazach ahe ani mi tyacha. Khartar tyachya shivay hya jagat mala apal mhananar konich nahi.
ReplyDeleteफार सुंदर.
ReplyDeleteहृदयस्पर्शी..अंगावर काटा आला..
ReplyDeleteKhoop chan !!
ReplyDeleteKhoop chan !!
ReplyDeleteBeautifully written
ReplyDeleteVery well personified Abhi! Khup chaan...
ReplyDeleteAmrapali
Khupach chan abhi
ReplyDeleteAbhi ....... Mitraaaa..
ReplyDeleteKhoooooop chhan..
खूपच सुंदर
ReplyDeleteKhup mast!!!!
ReplyDeleteसख्खा काय सावत्र जय.
ReplyDeleteकुणी झालं कसं कुणी कलम...
कमाल लिहिली आहेस.
अभिजित तुझं अभिनंदन
ReplyDeleteनेहमीच तु शब्दाला जागतोस शब्द रचना खुपच भारी असते तुझी तुझ्यात शब्द रचनेची ती ताकद आहे तुझ्या प्रत्येक लिखाणात एक सामाजिक संदेश दडलेला असतो तो तु मांडतोस हे
धन्यवाद अभिजित
Khup chan👌👌
ReplyDelete