Thursday, 9 August 2018

आवाज

आवाज

हल्ली काय झालंय,
हल्ली आवाजालाही जात आल्ये...
कुणी म्हणतं आंदोलन,
कुणी म्हणे गवताला
तलवारीची पात आल्ये

पात झाली म्हणून का
गवतानं आपली रीत सोडावी?
पोटं भरण्याऐवजी
मुक्या जिवांचीही जीभ कापावी?

आवाजाचं म्हणाल ना,
तर तो सगळीकडेच आहे
पण हल्ली, तो विचाराच्याही
एक पाऊल पुढेच आहे

नुसती एक साद आली की त्याला
प्रतिसाद देणारा आपला समाज आहे
खरी गोची तिथे आहे
जिथे विचाराविना आवाज आहे

आताश्या नुसतं खुट्ट झालं
तरी भीती वाटते धमाका होण्याची
जीव गेला तर ठीक
खरी धास्ती आहे मनानं पांगळं होण्याची

आपला आवाज ऐकला जावा
म्हणून गोंगाट करणारेच फार झाल्येत
भावनांचे वाहक म्हणून जन्मलेले सूर
मूळ शब्दांनाच भार झाल्येत

सवयच जडल्ये आता आवाजाची अरेरावी
मुकेपणानं सहन करण्याची
सहजसोपे असलेले प्रश्न
मुद्दामच गहन करण्याची

वैश्विक वगैरे असलेले प्रश्न
मेंदूला सोडवत बसू दे
एकच प्रार्थना...
मनातल्या आवाजांचे संवाद होऊन
सारं जग हसू दे...
सारं जग हसू दे

- अभिजित

11 comments:

  1. आवाज खुपच छान आहे हा आवाज bottom तो top read केल्याने एक वेगळीच स्फूर्ती मिळाली धन्यवाद अभिजित

    ReplyDelete
  2. खूप मस्त अभिजीत...💐💐💐👌👌👌👍👍👍

    ReplyDelete
  3. अंतर्मुख करायला लावणारी मुक्त कविता

    ReplyDelete
  4. Abhijit khoop sundar ani vichar karayala lavnar kavita

    ReplyDelete
  5. Awaz ha sarvan parayanth pohchu de mhanje tya nantar Shanti may hoil Vatavaran

    ReplyDelete
  6. वा क्या बात हे अभीजीत!! really nice thought🙏🙏

    ReplyDelete
  7. vastavik ani chhan.. sadya paristhitishi connect karnari!

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर विचार .अप्रतिम .

    ReplyDelete